नाव :- कु. स्वप्नील गोकुळ पवार

पत्ता :- मु. पो. पाटण ता. सिंदखेड जि. धुळे.  पिन कोड :- 425406

मो. नंबर :- 9370934310, 7796010453

शिक्षण :- S.Y.B.A चालू                    

                               आपल्या भारतीय गोवशामध्ये दुध उत्पादनासाठी जे गोंवश प्रसिद्ध आहेत त्यापेकी सर्वोत्तम गोंवश म्हणून सिद्ध झालेला गीर गोंवश आहे. दारात गीर गाय दुधासाठी असणं, हे भारतीय शेतक-याच्या दृष्टीने प्रतिष्ठेचं समजलं जातं. अशाच शेतकरी कुटुंबात स्वप्नील चा जन्म झाला. आई पाचवी तर वडील सातवी शिकलेले वडलोपार्जित पाच एकर शेती करून आपल्या तीन मुलांचा सांभाळ करीत आपल्या तीन मुलांमधील स्वप्नील हा सर्वात लहान होता. लहान पणा पासून आपण काहीतरी वेगळे केले पाहिजे असे स्वप्नील च्या मनात येई अशातच वडिलांनी लग्नामध्ये नृत्य काम करणारे घोडे विकत घेतले व त्या व्यवसायाला सुरुवात केली. हा व्यवसाय तीन महीने चालायचा व त्यानंतर शेती करायची हा त्यांचा  नित्यक्रम झाला होता. स्वप्नील या बाबी जवळून पहात होता व स्वप्नील पण शाळा करून वडिलाना जेवढे शक्य होईल तेवढी या व्यवसायात वडिलाना मद्दत हि करत होता

                              अशातच सन २०१७ -१८ वर्षी स्वप्नील बारावी उत्तीर्ण झाला. आपण वडिलान पेक्षा काहीतरी वेगळे काही तरी करायचे. या हेतूने स्वप्नील साने गुरुजी कर्म भूमी स्मारक केंद्र अंबळनेर या संस्थेच्या श्रीमती दर्शना पवार मॅडम च्या संपर्कात आला. त्या ठिकाणच्या विविध सत्रातून असे लक्षात आले कि स्वप्नील काहीतरी व्यवसायभिमुख शिक्षण हे दिले गेले पाहिजे. फक्त शिक्षण नको तर हाताने काम व त्यास विज्ञानाची जोड या अपेक्षाने सन २०१८-१९ साली स्वप्नील विज्ञान आश्रमात आला एक वर्ष भर राहून DBRT अभ्यासक्रम पूर्ण केला. व्यवसायाच्या अंगाने अनेक बाबी शिकून घेतल्या  कोर्स करत असताना स्वप्नील  ला असे वाटू लागले कि आपण पुढे जावून प्लंबिंग शेत्रात  करीयर करायचे हे ध्येय घेऊन स्वप्नील  अधिक अधिक काम प्लंबिंग  मधील करू लागला.

                               कोर्स पूर्ण झाल्यावर स्वप्नील पाबळ मधील एका प्लंबिंग व्यवसाय करणाऱ्या कडे चार महिने उमेदवारी केली त्या ठिकाणी त्यांला प्रती महिना ५००० रु मिळत. प्लंबिंग काम करण्यास सुरुवात केली. काम करण्यासाठी अनेक वेळा बाहेर जावे लागत व जेंव्हा एखाद्या ठिकाणी प्लंबिंग करत असताना असे लक्षात येई कि या ठिकाणी लाईट फिटिंग पण करायची आहे व याच संधीचा फायदा घेऊन स्वप्नील लाईट फिटिंग सुधा करू लागला. चार महिने झाल्यावर स्वप्नील ला वाटू लागले कि आता आपन आपल्या गावी जाऊन आपला स्वताचा व्यवसाय सुरु करावा व स्वप्नील  गावी गेला व सुरुवातीला कामे कमी येऊ लागली व स्वप्नील ला वेळ मिळू लागला आपण या वेळचा काहीतरी सदुपयोग केला पाहिजे या साठी स्वप्नील  ने घरी असलेल्या एका गिर गाईकडे आपले लक्ष केंद्रित केले. व तो त्या गाईचे दुध विक्री करू लागला त्याच्या असे लक्षात आले कि गिर गाईचे दुध हे ७५ रु लिटर जात आहे तर आपण अजून गाई वाढवल्या तर आपल्याला दुसरे काही करायची गरच भासणार नाही.

स्वप्निल पवार गिर गाईसोबत

                               व्यवसायाला सुरुवात केली सुरुवातीला बर्याच अडचणी आल्या आलेल्या अडचणीची नोंद ठेवली काय चुका केल्या त्या परत जाणून घेतल्या व स्वप्नील पुढे जात राहिला व त्यांनी आपण याकडे एक व्यवसाय म्हणून पहात आहोत व मला हा व्यवसाय मोठा करायचा आहे. हा प्रस्ताव आपले वडील व भावा समोर ठेवला. त्यांनीही त्यास सहमती दर्शवली व त्याने सर्वात प्रथम आपल्या शेतात चाऱ्याचे नियोजन केले व त्यान कडून  आर्थिक मदतीतून स्वप्नील ने जवळपास तीन लाख रुपयाच्या पाच गिर गाई विकत घेतल्या. आता स्वप्नील कडे जवळ पास पाच गाईच्या माध्यमातून त्यास प्रती दिवस सरासरी ३० लिटर दुध मिळत आहे व प्रती लिटर ७५ रु प्रमाणे स्वप्नील दुध विक्रीतून प्रती दिवस २२५० रु प्रती दिवस मिळत आहे खर्च वजा जाता ११५० रु प्रती दिवस स्वप्नील ला मिळत आहे. स्वप्नील ला पुढे जाऊन गिर गाईंचा मुक्त गोठा करायचा मानस असून त्या पद्धतीने त्याने काम सुधा सुरु केले आहे.