विज्ञान आश्रम उद्योजकता विकास कार्यक्रम अंतर्गत कोविड च्या परिस्थितीमध्ये अन्न पदार्थ निर्मिती हा कोर्स ऑनलाइन घेण्यात आला . सदरच्या प्रशिक्षण कार्यक्रमात खाद्य पदार्थ क्षेत्रातील उद्योग संधी , मार्केट सर्वे , तांत्रिक माहिती इ. संबंधी मार्गदर्शन करण्यात आले . त्यामधील नव उद्योजिका सौ . स्वाती अतुल गवंडी मु.पो तडसर ता कडेगाव जि .सांगली या सहभागी झाल्या होत्या . बिर्याणी बनवण्याचे कौशल्य त्यांना होते परंतु त्यांना त्याचे व्यवसायात रूपांतर करण्यासाठी मार्गदर्शनाची गरज होते .

प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण होताच त्यांनी बिर्याणी बाय किलो या संकल्पनेनुसार ऑर्डर प्रमाणे बिर्याने बनविण्यास सुरुवात केली आहे . सध्या सौ . गवंडी या तडसर गाव आणि परिसरामध्ये ऑर्डर प्रमाणे बिर्याणी बनवून विकत आहेत . प्रशिक्षण कार्यक्रमातील बिझनेस प्रपोजल या घटकाद्वारे त्यांनी व्यवसायातील अर्थशात्र अतिशय उत्तम रीत्या समजून घेतले असून सध्या त्या छोट्याशा व्यवसायचे तालुका स्तरावर बिर्याणी बनवून विकण्याचे त्यांचे नियोजन आहे आणि त्यानुसार त्यांनी काम चालू केले आहे .