विज्ञान व तंत्रज्ञान विभाग (Dept of Science and Technology (Govt of India) भारत सरकार आणि प्राज फाउंडेशन यांच्या सहकार्याने, विज्ञान आश्रम ‘ उद्योजकता विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करत आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने घेतला जाईल.
उद्योजक बनू इच्छिणारे विद्यार्थी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतील.

प्रशिक्षण सुरू होण्याची तारीख: ०१ फेब्रुवारी २०२१.
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख: २० जानेवारी २०२१.
नावनोंदणीसाठी खालील लिंकचा उपयोग करावा: https://forms.gle/BpNp6aVpABai6TF47
युवकांनी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व्यवसाय कसे सुरू करावेत याचे प्रशिक्षण या कार्यक्रमात दिले जाईल.
उद्योगांची निवड , मार्केट सर्वेक्षण, प्रॉडक्ट / सेवा Prototype तयार करणे व चाचणी करणे, सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट, , MSME आणि शासकीय योजना, आर्थिक नियोजन, भांडवली खर्च, Break Even Point, ROI, नफा आणि ताळेबंद, Tax, Product Planning & Product Mix Strategy, मार्केटिंग- जाहिरात व विक्री, IPR, Pattern, Copy Rights, Trade Mark etc., कंपनी रजिस्ट्रेशन, व्यवसाय प्रस्ताव आणि बँक लोन, इत्यादी विषय या प्रशिक्षणात अंतर्भूत असतील.
फायदे: प्रशिक्षणानंतर विज्ञान आश्रमात उद्योजक फेलोशिप ची संधी. ज्यामधे विद्यार्थी आपले प्रॉडक्ट किंवा सेवा यांचे Prototype तयार करून टेस्ट करू शकता व विक्रीसाठी प्रॉडक्ट किंवा सेवा तयार करू शकता.
व्यवसाय उभारण्यासाठी संपूर्ण मदत व एक व्यवसाय चक्र पूर्ण होई पर्यन्त संपूर्ण सहकार्य.