आकाश ढमाले या विज्ञान आश्रम च्या माजी विद्यार्थ्याने पुणे नाशिक महा मार्गावरील पेठ ता .आंबेगाव जि .पुणे या ठिकाणी स्वत:चा फॅब्रिकेशन व्यवसाय सुरू केला आहे . ग्रामीण भागातील शेतकर्‍यांच्यासाठी शेतीची अवजारे , ट्रॅक्टर ट्रॉलि , गाड्यांचे बॉडी बिल्डिंग इत्यादी कामे आता पेठ मध्येच होऊ लागली आहेत .

आकाश ने फॅब्रिकेशन व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे . मासेमारी व्यवसाया साठी आवश्यक मोठ्या टाक्यांचे बनवून देण्याचे आणि त्याचे ग्राहकाच्या ठिकाणी बसवून देण्याचे काम आकाश करत आहे . अशाप्रकारे आकाश आपल्या व्यवसायात प्रगती करत आहे आणि नवनवीन तंत्रज्ञान वापरुन लोकांना चांगल्याप्रकरच्या सेवा देत आहे . विज्ञान आश्रम चे व्यवसायासाठी प्रोत्साहन आणि प्रशिक्षण तसेच मार्गदर्शन मिळाल्याचे आकाश सांगतो .