विज्ञान आश्रम सध्याच्या कोविड च्या परिस्थितीमध्ये वेबिनार च्या माध्यमातून विविध विषयांवर मार्गदर्शन करत आहे आणि याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना बेसिक इलेक्ट्रॉनिक्स ची माहिती व्हावी या अनुषंगाने विज्ञान आश्रम च्या DIY LAB गटाने हा वेबिनार आयोजित केला होता . इलेक्ट्रॉनिक्स मधील मूलभूत घटक जसे की कपॅसिटर , रेजिस्टर , बॅटरी , एलईडी , इ . ची प्राथमिक माहिती देण्यात आली . बुधवार दि. 6 मे 2020 रोजी वेबिनार घेण्यात आला .

मूलभूत घटक वापरुन आपण इलेक्ट्रॉनिक्स मधील छोटे प्रकल्प कसे बनवू शकतो उदा . एलईडी सर्किट तयार करणे . DIY Lab च्या प्रमुख स्नेहल महाजन मॅडम , फॅबलॅब मॅनेजर सुहास लबडे , फॅबलॅब निर्देशक अदिति खराडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . या वेळी वेबिनार साठी १०० विद्यार्थी सहभागी झाले होते . वेबिनार साठी विज्ञान आश्रम चे संचालक डॉ . योगेश कुलकर्णी , उपसंचलक रणजीत शनबाग , आयबीटी कार्यक्रम प्रमुख सचिन पुणेकर यांचे मार्गदर्शन लाभले .