ग्रामीण भागात स्वतःचा व्यवसाय सुरु करताना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. योग्य व्यवसायाची निवड कशी करावी , व्यवसायासाठी लागणारे योग्य कौशल्य कोठून मिळवावीत, व्यवसायसाठी अनुभवी व्यक्तीचे मागदर्शन मिळवता येईल का , अर्थसाह्य / बँकेचे कर्ज मिळते का इ अनेक प्रश्न आपल्या समोर उभे राहतात! ह्या व अश्या इतर अनेक अडचणींवर मत करून स्वतःचा व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्या हुशार आणि होतकरू युवकांसाठी विज्ञान आश्रम आणि प्राज फौंडेशन (पुणे) ह्यांच्या तर्फे “ व्यवसाय शिष्यवृत्ती योजना” सुरु करण्यात आली आहे. ह्या योजनेचा प्रमुख उद्देश ग्रामीण भागातील नव-उद्योजकांना , त्यांच्या तंत्रज्ञान आधारित व्यवसाय उभारणीत सर्वोतोपारीने मदत करणे हा आहे. ह्या शिष्यवृत्ती योजनेची प्रमुख वैशिष्टे खालील प्रमाणे – ·
- ग्रामीण युवकांना त्यांनी निवडलेल्या व्यवसायत प्रतेक्ष अनुभवातून शिकण्यासाठी ६ महिन्यान पर्यंत , प्रती महिना ७००० रु. शिष्यवृत्ती. ·
- निवडलेल्या व्यवसायासाठीचे आवश्यक कौशल्य शिक्षण (राहण्याची आणि भोजनाची सोय) ·
- प्रत्यक्ष व्यवसायाच्या ठिकाणी तज्ज्ञ व्यवसायिकांनकडून ट्रेनिंग तसेच मार्गदर्शन. ·
- व्यवसाय करण्यासाठी आवश्यक अर्थसाह्य (कर्ज पुरवठा).·
- गरजू आणि होतकरू मुलांसाठी कमवा आणि शिका योजना. ·
- व्यवसाय फायद्यात येईपर्यंत , व्यवसायाच्या ठिकाणी तज्ज्ञच्या प्रतेक्ष भेटीद्यारे मार्गदर्शन.
सदरच्या योजनेत सहभागी होण्यासाठीची पात्रता / अटी – ·
- निवडलेल्या व्यवसायाची प्राथमिक माहिती आणि गरजेचे कौशल्य विद्याथ्याकडे असले पाहिजे.·
- सादर व्यासायासाठी लागणारे कौशल्य विद्याथ्याकडे नसल्यास , विज्ञान आश्रमातर्फे त्यासाठीचे शिक्षण देण्यात येईल , परंतु ह्या कालावधीत (कमीत-कमी २ महिने) शिष्यवृत्ती मिळणार नाही. ·
- शिष्यवृत्ती योजनेसाठी अनुभवी नव-उद्योजकांना प्राधान्य देण्यात येईल. ·
- योजनेतील सहभाग प्रतेक्ष मुलाखती नंतरच निश्चित केले जाईल.
ह्या योजनेत सहभागी होण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवरती क्लिक करून अर्ज (फॉर्म) भरावा –
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScoItECoWr3x8JfGLu2pqQuaUTc3WX5them_4zPIhjxVR6ZsQ/viewform?c=0&w=1